world-service-rss

BBC News मराठी

टीम इंडियानं जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी, न्यूझीलंडवर चार विकेट्स राखून मात

टीम इंडियानं जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी, न्यूझीलंडवर चार विकेट्स राखून मात

रविवार, ९ मार्च, २०२५ रोजी ४:२९:५८ PM

टीम इंडियानं तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं आहे. रोहित, श्रेयस, राहुल आणि हार्दिकची फलंदाजी आणि वरुण-कुलदीपची गोलंदाजी भारताच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरली.

ऑपरेशन मोगादिशू : जेव्हा रक्तबंबाळ सैनिकांना ट्रकमध्ये भरून सोमालियातून अमेरिकेला पळावं लागलं

ऑपरेशन मोगादिशू : जेव्हा रक्तबंबाळ सैनिकांना ट्रकमध्ये भरून सोमालियातून अमेरिकेला पळावं लागलं

रविवार, ९ मार्च, २०२५ रोजी ३:०५:१९ PM

अमेरिकन सैन्य त्यांच्या प्रचंड शक्तीसाठी ओळखलं जातं. मात्र सोमालियासारख्या अत्यंत गरीब आणि मागासलेल्या देशात याच अमेरिकन सैन्याची त्रेधातिरपीट उडाली होती.

विस्मरणात गेलेले शिलेदार, अंकल सॅम आणि ‘ते’ 12 तंत्रज्ञान; वाचा आयफोन बनण्यामागची ‘खरी’ गोष्ट

विस्मरणात गेलेले शिलेदार, अंकल सॅम आणि 'ते' 12 तंत्रज्ञान; वाचा आयफोन बनण्यामागची 'खरी' गोष्ट

रविवार, ९ मार्च, २०२५ रोजी १:००:२७ PM

आयफोन. ॲपल कंपनीच्या स्टीव्ह जॉब्सनं तयार केलेलं एक छोटं यंत्र ज्याने संवाद आणि संपर्काव्यतिरिक्तही इतर अनेक क्षेत्रात क्रांती आणली. आपल्या आजच्या अर्थव्यवस्थेला आधुनिक बनवण्यात या आयफोनचा मोठा वाटा आहे.

शेख हसीनांना पळवून लावणाऱ्या विद्यार्थ्यांनी काढला नवा पक्ष, बांगलादेशातील राजकीय स्थिती पुन्हा बदलेल?

शेख हसीनांना पळवून लावणाऱ्या विद्यार्थ्यांनी काढला नवा पक्ष, बांगलादेशातील राजकीय स्थिती पुन्हा बदलेल?

रविवार, ९ मार्च, २०२५ रोजी ९:१८:४० AM

बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं. या आंदोलनामुळेच बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आणि देशातून पलायन करावं लागलं होतं.

‘आमच्या 22 गावांना वीज द्या’, थेट राष्ट्रपतींकडे मागणी करणाऱ्या महिला सरपंचांच्या गावात सध्या काय आहे स्थिती?

'आमच्या 22 गावांना वीज द्या', थेट राष्ट्रपतींकडे मागणी करणाऱ्या महिला सरपंचांच्या गावात सध्या काय आहे स्थिती?

रविवार, ९ मार्च, २०२५ रोजी ६:५३:०४ AM

“आमच्या भागातील गावांना वीज द्या,“ असा प्रश्न थेट राष्ट्रपतींना विचारणारी महिला सरपंच सध्या चर्चेत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून बादशाह अकबरांविषयी काय म्हटलं होतं?

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून बादशाह अकबरांविषयी काय म्हटलं होतं?

रविवार, ९ मार्च, २०२५ रोजी २:४४:५५ AM

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून बादशाह अकबरानं अंमलात आणलेल्या सहिष्णू आणि सर्वधर्मसमभावाच्या धोरणाची आठवण करून दिली होती, याचाही उल्लेख करत त्याचं महत्त्व इरफान हबीब यांनी स्पष्ट केलं.

रशियाचा युक्रेनवर हल्ला, किमान 25 लोकांचा मृत्यू; अनेकजण जखमी

रशियाचा युक्रेनवर हल्ला, किमान 25 लोकांचा मृत्यू; अनेकजण जखमी

रविवार, ९ मार्च, २०२५ रोजी ४:००:०९ AM

युक्रेनच्या दोनेत्स्क आणि खारकीएव्ह भागात झालेल्या रशियन हल्ल्यांत जवळपास 25 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी असल्याची माहिती युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल कसं फॉलो करायचं?

बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल कसं फॉलो करायचं?

शुक्रवार, ३१ मे, २०२४ रोजी १०:३४:२२ AM

तुम्ही आता थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर बीबीसी मराठीवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, महत्त्वाचे लेख आणि ब्रेकिंग न्यूज मिळवू शकता.

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्रातून अकबराबद्दल काय सांगितलं होतं?

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्रातून अकबराबद्दल काय सांगितलं होतं?

रविवार, ९ मार्च, २०२५ रोजी ११:१६:४० AM

प्राध्यापक इरफान हबीब यांनी बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पहिल्यांदाच प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्ती, इतिहास पाहण्याच्या आणि मूल्यांकन करण्याचा दृष्टीकोण तसेच सध्याच्या वादविवादाबद्दल कॅमेऱ्यासमोर चर्चा केली आहे.

राष्ट्रपतींकडे 22 गावांसाठी वीज मागणाऱ्या मेळघाटच्या सरपंच

राष्ट्रपतींकडे 22 गावांसाठी वीज मागणाऱ्या मेळघाटच्या सरपंच

रविवार, ९ मार्च, २०२५ रोजी ८:०८:०० AM

मेळघाटातील 22 गावांना वीजेअभावी अंधारात राहावं लागतंय. मेळघाटामधील सरपंच ललिता बेठेकर यांनी थेड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडेच वीजेचा प्रश्न मांडला होता.

वैशाली निलंगेकर : कर्णबधीर मुलीला स्विमर बनवणारी आई

वैशाली निलंगेकर : कर्णबधीर मुलीला स्विमर बनवणारी आई

शनिवार, ८ मार्च, २०२५ रोजी ७:२७:२४ AM

छत्रपती संभाजीनगरच्या वैशाली निलंगेकर यांनी अत्यंत कष्टातून आपल्या कर्णबधिर मुलीला आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू बनवलंय.

स्वारगेटच्या पीडितेबद्दल का उपस्थित केले जातायत प्रश्न? वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया

स्वारगेटच्या पीडितेबद्दल का उपस्थित केले जातायत प्रश्न? वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया

शुक्रवार, ७ मार्च, २०२५ रोजी ४:५१:०८ PM

महिलेचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी कोर्टाकडून मनाई आदेश मिळवला. या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल त्यांनी काय सांगितलं ऐका.

लोणार सरोवर कसे आणि केव्हा तयार झाले? तिथे काय काय होते?

लोणार सरोवर कसे आणि केव्हा तयार झाले? तिथे काय काय होते?

रविवार, २ मार्च, २०२५ रोजी ८:१०:५७ AM

काही अभ्यासक लोणारचा अभ्यास मंगळ आणि चंद्राच्या पृष्ठभाग समजून घेण्यासाठी करत आहेत.

गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : पुरुषांसाठीची गर्भनिरोधकं स्वीकारण्यास आपण कितपत तयार आहोत?

गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : पुरुषांसाठीची गर्भनिरोधकं स्वीकारण्यास आपण कितपत तयार आहोत?

शनिवार, २५ जानेवारी, २०२५ रोजी १२:००:०० AM

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.

‘मुलगी इंजिनीअर बनावी म्हणून साचवलेले पैसे बुडाले’, FIITJEE क्लासेस अचानक बंद झाल्याचा नेमका गोंधळ काय?

'मुलगी इंजिनीअर बनावी म्हणून साचवलेले पैसे बुडाले', FIITJEE क्लासेस अचानक बंद झाल्याचा नेमका गोंधळ काय?

शनिवार, ८ मार्च, २०२५ रोजी २:४६:२६ AM

नागपुरातील 60 पालकांचे 76 लाख रुपये बुडाले असून कोचिंग सेंटरच्या मालकानं पैसे परत द्यावे अशी त्यांची मागणी आहे.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला उशीर झाला का? यामागे काय कारणं होती?

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला उशीर झाला का? यामागे काय कारणं होती?

बुधवार, ५ मार्च, २०२५ रोजी १:४३:१८ AM

महायुतीच्या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 4 मार्चला राजीनामा दिला.

‘खंडणीच्या आड येवू नको, वाल्मिक अण्णा तुला जिवे सोडणार नाही’; दोषारोपपत्रात नेमकं काय आहे?

'खंडणीच्या आड येवू नको, वाल्मिक अण्णा तुला जिवे सोडणार नाही'; दोषारोपपत्रात नेमकं काय आहे?

मंगळवार, ४ मार्च, २०२५ रोजी ७:४८:४९ AM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दोषारोपत्र बीड जिल्हा विशेष न्यायालयात सादर केले आहे. यात प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा उल्लेख करण्यात आला आहे.

एकेकाळी लोकांच्या मनावर राज्य करणारी सोलापुरी चादर का मोजतीये अखेरच्या घटका?

एकेकाळी लोकांच्या मनावर राज्य करणारी सोलापुरी चादर का मोजतीये अखेरच्या घटका?

मंगळवार, ४ मार्च, २०२५ रोजी ३:०२:३१ AM

सोलापूर शहराचीच नाही तर अवघ्या महाराष्ट्राची शान म्हणून ओळखली जाणाऱ्या सोलापुरी चादरीच्या व्यवसायात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. काय आहेत याची कारणे?

संतोष देशमुख यांना अमानुष मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर केजमध्ये तणावपूर्ण शांतता

संतोष देशमुख यांना अमानुष मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर केजमध्ये तणावपूर्ण शांतता

मंगळवार, ४ मार्च, २०२५ रोजी ३:३६:०९ AM

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यानंतर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण करतानाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय.

रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड, आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड, आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

रविवार, २ मार्च, २०२५ रोजी १२:१६:०८ PM

स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्याची मुलीची अशापद्धतीने छेड काढली जात असेल तर राज्यातील सामान्य महिलांचं काय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. 28 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

‘कानिफनाथ कुण्या एका समाजाचा नाही, तर सगळ्यांचा देव,’ मढी गावातील मुस्लीम व्यापारी काय म्हणतात?

'कानिफनाथ कुण्या एका समाजाचा नाही, तर सगळ्यांचा देव,' मढी गावातील मुस्लीम व्यापारी काय म्हणतात?

शनिवार, १ मार्च, २०२५ रोजी २:२५:०० AM

मढी गावात दरवर्षी कानिफनाथ महाराजांची यात्रा भरते. देशभरातून मोठ्या संख्येनं लोक इथं येतात. यंदाच्या यात्रेत मात्र मुस्लीम समाजाच्या व्यावसायिकास दुकान लावू न देण्याचा निर्णय मढी ग्रामसभेनं घेतला आहे.

स्वारगेट प्रकरणातील आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी, कंडक्टर असल्याचं भासवून ओढलं होतं जाळ्यात

स्वारगेट प्रकरणातील आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी, कंडक्टर असल्याचं भासवून ओढलं होतं जाळ्यात

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५ रोजी ८:०९:४६ AM

ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलीस शोध घेत होते. गेले तीन दिवस या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली होती.

‘आजच्या सर्व जटील प्रश्नांचं उत्तर गांधी विचार आहे’ - ब्लॉग

'आजच्या सर्व जटील प्रश्नांचं उत्तर गांधी विचार आहे' - ब्लॉग

शनिवार, ८ मार्च, २०२५ रोजी ३:२७:५९ PM

गांधीजी हे केवळ भारताचे राष्ट्रापिताच नाहीत, तर आपण भारतीय माणसातील उदात्तता, सहिष्णूता व एकमेकांशी धरून बंधुतेने शांततामय सहअस्तित्वाने राहण्याच्या अभिमानस्पद भारतीय वारशाचे ते एक उन्नत व अनुकरणीय प्रतिक आहेत.

सावरकरांच्या ‘गाजलेल्या उडी’चं सत्य काय? अरुण शौरींच्या पुस्तकात नवे दावे

सावरकरांच्या 'गाजलेल्या उडी'चं सत्य काय? अरुण शौरींच्या पुस्तकात नवे दावे

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी ६:१२:३३ AM

प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार लेखक अरुण शौरी यांनी सावरकरांच्या ‘गाजलेल्या उडी’बद्दल नवे दावे केले आहे. त्यांच्या मते सावरकरांची समुद्रातल्या उडीची वर्णनं ‘अतिरंजित’ आहे.

स्वातंत्र्यानंतर दिल्लीहून काश्मीर खोऱ्यात थेट रेल्वे जाण्यासाठी 78 वर्षं का लागली?

स्वातंत्र्यानंतर दिल्लीहून काश्मीर खोऱ्यात थेट रेल्वे जाण्यासाठी 78 वर्षं का लागली?

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५ रोजी ७:१०:०७ AM

भारताच्या राजधानीतून काश्मीर खोऱ्यात जाणारी पहिली ऐतिहासिक ट्रेन स्वातंत्र्यानंतर तब्बल 78 वर्षांनी धावण्यासाठी सज्ज आहे.

डोळ्यांसमोर मायबापाचे मृत्यू पाहिले, व्यवस्थेनं हाती शस्त्र दिले; ‘इंडियन रॉबिनहूड’ची थरारगाथा

डोळ्यांसमोर मायबापाचे मृत्यू पाहिले, व्यवस्थेनं हाती शस्त्र दिले; 'इंडियन रॉबिनहूड'ची थरारगाथा

रविवार, २६ जानेवारी, २०२५ रोजी ७:२१:५८ AM

स्वतः विरोधात झालेल्या अन्यायानं पेटून उठल्यानंतर इतरांच्याही अन्यायाची जबाबदारी स्वतःहून खांद्यावर घेत लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ते अखेरपर्यंत लढले.

प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपणारी आगळीवेगळी परंपरा, काय आहे यामागचा अर्थ?

प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपणारी आगळीवेगळी परंपरा, काय आहे यामागचा अर्थ?

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५ रोजी १:४०:१० PM

आपल्या प्रियजनांच्या आठवणींमध्ये कलबंडावर म्हणजेच स्मृतिस्तंभावर अशा अनेक गोष्टी ठेवल्या जातात.